Tuesday, May 5, 2009

विश्ह्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामक्‍इश्ह्णीं मन नाहीं ज्याचे ॥ १ ॥

उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामक्‍इश्ह्णीं पैठा कैसा होय ॥ २ ॥

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचें ॥ ४ ॥


विष्णूचें नामस्मरणावांचून इतर जप करणारा आणि रामकृष्णस्वरूपीं ज्याचें मन नाही त्याचें ज्ञान व्यर्थ आहे. ॥ १ ॥ जन्माला येऊन द्वैतभावरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग ज्यास माहीत नाही तो हतभागी होय. त्याची वस्ती रामकृष्णस्वरूपी कशी होईल ? म्हणजे रामकृष्णस्वरूपीं ऐक्याला तो कसा पावेल ? ॥ २ ॥ ज्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानानें अहं (मी) इदं (हें) वृत्तिरूपी द्वैताची उत्पत्ति झाली त्या द्वैताचा नाश ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेंच होणार आहे. तें ज्ञान देणारे गुरु आहेत. गुरूवाचून तें कधीही मिळणार नाही; व ज्या साधकाला ते मिळालें नाही, त्याला नामी जो परमात्मा, त्याचें अभेदभजन घडत नाहीं. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरीच्या सगुणसाकार स्वरूपाचेंच ध्यान आहे, आणि त्याच्याच नामाची मी सतत आवृत्ति करीत असून प्रापंचिक गोष्टी संबंधानें मौन घेतलें आहे. ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment