२६
एक तत्त्व नाम द्इढ धरीं मना । हरीसी करुणा ये{ई}ल तुझी ॥ १ ॥
तें नाम सोपें रे रामक्इश्ह्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥ २ ॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणि पंथा जाशी झणी ॥ ३ ॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४ ॥
हरीचें नाम हेंच तत्त्व आपल्या मनामध्यें बळकट धरा, म्हणजे एकट्या हरिनामाचें मनानें सारखें चिंतन करीत रहा, त्या योगानें हरीला तुझी दया येईल. ॥ १ ॥ राम कृष्ण गोविंद हें नाम सोपे आहे, म्हणून अगोदर तें प्रेमानें घे. ॥ २ ॥ हरीच्या नामाखेरीज जीवाला संसारातून सोडविण्यास दुसरें साधन नाहीं. तूं दुसऱ्या साधनांकडे जाशील तर फसशील. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मौन घेऊन अंतःकरणामध्यें जपमाळ धरून निरंतर श्रीहरीचा जप करीत आहे. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment