Tuesday, May 5, 2009

११

हरि{उ}च्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥ १ ॥

त्‍इण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपता हरी ॥ २ ॥

हरि{उ}च्चारण मंत्र पैं अगाध । पळे भूतबाधा भय याचें ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिश्हदां ॥ ४ ॥


हरिनामाचा जप केल्यानें पापाच्या अनंत राशी एका क्षणांत नाहीशा होतात. ॥ १ ॥ गवताचा व अग्नीचा संबंध झाला की तें गवत अग्निरूप होतें, त्या प्रमाणें हरीचा जप निरंतर करीत असलें, म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. ॥ २ ॥ हरीच्या नाममंत्राचें सामर्थ्य अपूर्व आहे. त्याचे धाकानें भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाच्चबाधा नाहीशी होते, इतकेंच नव्हे, तर जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते; म्हणजे हरिनामानें देहाभिनाचा नाश होतो. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यथार्थ निर्णय उपनिषदाकडूनही झाला नाही ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment