१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणे कोणी ॥ १ ॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटण ॥ २ ॥
मनोमार्गें गेला तो तेथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥ ३ ॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामक्इश्ह्णी आवडी सर्वकाळ ॥ ४ ॥
जो हरिवंशपुराण वाचतो, आणि यथार्थ हरिनामाचें कीर्तन करतो व हरिवांचून दुसरें कोणीही प्रिय जाणत नाही, त्या मनुष्याला वैकुंठाचा लाभ झाला आणि त्याला सर्व तीर्थयात्रा घडल्या असें समजावें. ॥ १-२ ॥ मनोवृत्तीप्रमाणें वागणारा असल्या लाभाला आचवतो. हरिभजनामध्यें जो स्थिर झाला तोच धन्य होय. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनामाच्या लाभाचीच मला गोडी असून मला सतत रामकृष्णस्वरूपींच आवड आहे. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment