Tuesday, May 5, 2009

२२

नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्षुमीवल्लभ तयां जवळी ॥ १ ॥

नारायण हरी नारायण हरी । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥ २ ॥

हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३ ॥

ज्ञानदेव पुसे निव्‍इत्तिसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४ ॥



सतत हरीचें नाम घेण्याचा ज्यांचा नियम आहे असे प्राणी दुर्मिळ आहेत. त्यांच्याजवळ लक्ष्मीचा पति विष्णु असतो. ॥ १ ॥ नेहमी नारायण हरि, नारायण हरि, अशा नामाचा जो जप करतो त्याच्या घरीं सर्व ऐश्वर्य व सलोकतादि चारी मुक्ति असतात ॥ २ ॥ जन्मास येऊन जर हरीची ओळख झाली नाही तर त्या जन्मास नरकच समजावें, आणि तो प्राणी यमाचे घरचा पाहुणा होतो म्हणजे यमलोकास जातो, आणि यमाकडून त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु जे निवृत्तिनाथ, त्यांस हरीचें नाम केवढें आहे असा आपले एच्छेनुरूप प्रश्न केला असतां, त्यावर गुरु निवृत्तिनाथांकडून आकाशापेक्षांही नाम मोठें आहे असें उत्तर मिळालें. ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment