२१
काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥ १ ॥
रामक्इश्ह्ण नाम सर्व दोश्हां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥ २ ॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥ ४ ॥
हरीचें नाम घेण्याला शुद्ध काळ वेळेची जरूर नाही. तें हवें तेव्हा घावे, त्या योगानें आपल्या आईचें कुळ व बापाचें कुळ या दोहोंचाही उद्धार होतो. दुसरा अर्थ :- नाम घेणारा व ऐकणारा या उभयतांचा उद्धार ह्तो. ॥ १ ॥ रामकृष्णाचें नाम सर्व पापांचा नाश करणारें आहे. याप्रमाणें सर्व पापांचा नाश करून मूर्ख जीवांना तारणारा एक हरीच आहे. ॥ २ ॥ हरीचें नाम हेंच सार आहे. भजन करण्याकडे जिव्हेची ज्यानें योजना केली आहे, त्याचे दैवास उपमा कोणी द्यावी ? ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मजकडून हरीचे चिंतन यथासांग झालें, आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment