Tuesday, May 5, 2009

१७

हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥ १ ॥

तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥ २ ॥

मत्‍इपित्‍इभ्रात सगोत्र अपार । चतुर्भुज नर हो{ऊ}नि ठेले ॥ ३ ॥

ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें । निव्‍इत्तीनें दिधलें माझें हातीं ॥ ४ ॥



हरीचा जप करून वाणीनें हरीची कीर्ति जो गाईल त्याचा देह पवित्र होईल. ॥ १ ॥ हरिनामसंकीर्तनाच्या सामर्थ्यानें ज्यानें अगणित तप केलें तो अनंत कल्पपर्यंत वैकुंठांत वास्तव्य करतो. ॥ २ ॥ व आईबाप, भाऊबंद तसेच त्यांचे अनेक गोत्रज ही सर्व मनुष्ये चतुर्भुज होऊन वैकुंठी राहतात; म्हणजे त्यांना सरूपतामुक्तीचा लाभ होतो. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अति गुप्त आत्मज्ञानाचा लाभ माझे गुरु निवृत्तिनाथ यानी माझे हातीं दिल्यामुळे मी ज्ञानसंपन्न झालों. ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment