२३
सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १ ॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिश्ह्ठ । तेथें कांहीं कश्ह्ट न लागती ॥ २ ॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ३ ॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामक्इश्ह्णीं पंथ क्रमियेला ॥ ४ ॥
हा संसार कोणी सात तत्त्वामक आहे, कोणी पांच तत्त्वात्मक आहे, कोणी तीन तत्त्वात्मक आहे तर कोणी दहा तत्त्वात्मक आहे असें मानतात. दुसरा अर्थ : - सात अधिक पांच अधिक तीन अधिक दहा मिळून पंचवीस तत्त्वात्मक संसार मानतात. ही सर्व तत्त्वेंही हरि आपल्या एका चैतन्य तत्त्वावर दाखवतो. ॥ १ ॥ असा तत्त्वविचार करण्यापैकी हरीचें नाम नाही. ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. तें घेण्याला काही कष्ट पडत नाहीत. ॥ २ ॥ रात्री व दिवसां मिळून एकवीस हजार सहाशें वेळा सोहं सोहं असा आपले हृदयात प्राणाच्या वरती जाण्यांत आणि अपानाच्या खाली जाण्यात होणाऱ्या उभयतांचे भेटीत सहज जप होत असतो, त्यास अजपाजप म्हणतात. संकल्प सोडल्यास (म्हणजे २१३०० श्वास जे होतात त्यांमधून सोहं असा होणारा जप मी करतो असें म्हणून उदक सोडल्यास) साधकाचें मनाचा निश्चय असें करण्याकडे असतो. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणावांचून जगणें मला व्यर्थ वाटतें, म्हणून मी रामकृष्णाच्या भजनमार्गाचें क्रमण केलें आहे, म्हणजे निरंतर हरीचें भजन करीत आहे. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment