Tuesday, May 5, 2009

१४

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे द्‍इश्ह्टी ॥ १ ॥

रामक्‍इश्ह्णीं वाचा अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥ २ ॥

हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३ ॥

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निज स्थान ॥ ४ ॥



खऱ्या अपरिमित हरीचा जप निरंतर करणाराकडे कळिकाळ दृष्टीनें देखील पहात नाही. ॥ १ ॥ वाचेनें निरंतर रामकृष्णाचा जप केल्यानें तपाच्या अनंत राशी घडतात व त्या योगानें पापाचे समुदायचे समुदाय पुढें पळून जातात. ॥ २ ॥ हरि, हरि, हरि हा शिवाचा नित्य जप करण्याचा मंत्र आहे. या मंत्राचे जे कोणी वाचेनें ग्रहण करतील त्यास मोक्षाची प्राप्ति होईल. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी निरंतर नारायणनामाची आवृत्ति करतों, त्यायोगें देहत्रयातीत अति उत्तम आत्मस्वरूप स्थानाची मला प्राप्ति झाली आहे. ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment