२०
वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन । एक नारायण सारा जप ॥ १ ॥
जप तप कर्म हरीविण धर्म । वा{उ}गाचि श्रम व्यर्थ जाय ॥ २ ॥
हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥ ३ ॥
ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥ ४ ॥
हरिनामाच्या कीर्तनाची वैष्णव जनांनी जोड केलेली असते, त्यायोगानें त्यांची अनंत कोटी पातकें नाहींशी होतात. ॥ १ ॥ अनंतजन्मी केलेल्या तपांचे फल एक हरीचें नामस्मरण आहे. सर्व साधनामध्यें हरीचें चिंतन हें सुलभ साधन होय. ॥ २ ॥ अष्टांगयोग, यज्ञक्रिया, धर्म व अधर्मरूपी माया ही सर्व हरीच्या चिंतनानें लयाला जातात. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,आमच्या ठिकाणीं यज्ञ याग, क्रिया, धर्म सर्व काहीं हरि आहे. त्यावांचून दुसरा कांही नेमधर्म नाही. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment