२५
जाणीव नेणीव भगवंतीं नाही ं । हरि{उ}च्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥
नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥ २ ॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥ ३ ॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥ ४ ॥
भक्त ज्ञानी आहे किंवा अज्ञानी आहे हें भगवंत पहात नाहींत, तर त्यांच्या नामस्मरणानें दोघांनाही सारखीच मुक्ति मिळते. ॥ १ ॥ नारायणहरि या नामाचा उच्चार करणाराकडे कळिकाळाचा प्रवेश होत नाहीं. ॥ २ ॥ हरीच्या यथार्थस्वरूपाचा विचार वेदांनाही कळत नाही. मग तें स्वरूप सामान्य जीवांना कसें जळेल ? ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणानें सर्व मृत्युलोक वैकुंठ केल्याचें फळ मला मिळालें आहे ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment