Tuesday, May 5, 2009

२८

अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥ १ ॥

नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥ २ ॥

असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें करून स्मरण जीवी ॥ ३ ॥

अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥ ४ ॥

संतसज्जनानीं घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवीं तरें ॥ ५ ॥

श्रीगुरु निव्‍इत्ति वचन प्रेमळ । तोश्हला तात्काळ ज्ञानदेव ॥ ६ ॥



हरीच्या नामाचें यथार्थ कीर्तन हें सोपें साधन आहे. या योगानें अनेक जन्मातून केलेली सर्व पातकें जळून जातात. ॥ १ ॥ हें करीत असतां वनामध्यें जाण्याचे कष्ट करण्याची कांही जरून नाही. नारायण आनंदानें आपल्या घरीं येतो. ॥ २ ॥ जागच्याजागी बसून आपलें चित्त आपण एकाग्र करावें आणि मोठ्या प्रेमानें अनंताचें भजन करावें. ॥ ३ ॥ रामकृष्ण हरि विठ्ठल केशव हा मंत्र नेहमीं जपावा. ॥ ४ ॥ यावांचून हरीची प्राप्ति करून देणारें असें दुसरें साधन नाहीं, असें मी विठोबाची शपथ वाहून सांगतो. ॥ ५ ॥ तुकाराम महाराज म्हणतात सर्व साधनापेक्षां हरीचें नाम हें सोपें साधन आहे. जो कोणी शहाणा आहे तो या साधनांतच तृप्ति पावतो. ॥ ६ ॥

No comments:

Post a Comment