Tuesday, May 5, 2009

१६

हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ राम क्‍इश्ह्ण ॥ १ ॥

राम क्‍इश्ह्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धि ॥ २ ॥

सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निमाले साधुसंगे ॥ ३ ॥

ज्ञानदेवीं नाम रामक्‍इश्ह्ण ठसा । तेणें दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥



ज्याच्या बुद्धीमध्ये हरिचिंतनाचा जप चालू आहे आणि ज्याच्या वाणीमध्यें सुलभ रामकृष्णनामाचें वास्तव्य आहे असा मनुष्य फारच दुर्लभ असतो. ॥ १ ॥ ज्यांनी रामकृष्णनामाच्याच भजनानें संकल्पविकल्पात्मक मनरहित अशा निर्विकल्प सहज परमात्मस्थितीचा लाभ करून घेतला, त्याला परिपूर्ण परब्रह्मसिद्धि प्राप्त झाली अथवा त्याला जगांतील सर्व सिद्धि प्राप्त झाल्या. भगवत्‍चिंतनानें बुद्धीला सिद्धि प्राप्त होते, म्हणजे बुद्धीचे मल दूर होऊन तिची उत्तम सिद्धि होते, देहतादात्म्यानें पंचविषयाच्या भोगात गुंतलेल्या व त्रिविधतापानें तप्त झालेल्या प्रापंचिक जीवांची शांति साधूंच्या संगतीनें होते ॥ २-३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामचिंतनानें माझ्या हृदयांत रामकृष्णस्वरूपाचा ठसाच उमटला आहे. त्यायोगानें दाही दिशांमध्यें आत्माराम भरलेला भासत आहे. ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment